फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरू (एसआरआय-बी)ने कर्नाटकमधील पहिल्या ऑल-विमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज गीता शिशू शिक्षण संघ (जीएसएसएस) इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फॉर विमेन, म्हैसूर येथे सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी) उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांची प्रगती वाढवण्यासाठी असून, एसटीईएममधील (STEM) लैंगिक समानतेला चालना देण्याच्या सॅमसंगच्या प्रयत्नांचा भाग आहे. यात विद्यार्थिनींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशिन लर्निंग (ML), बिग डेटा, कोडिंग आणि प्रोग्रामिंगसारख्या तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये सॅमसंगच्या जागतिक आरअँडडी तज्ज्ञांनी विशेष डिझाइन केलेला अभ्यासक्रम आहे. यामध्ये विद्यार्थिनींना ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना एसआरआय-बी आणि जीएसएसएस इन्स्टिट्यूटच्या मेंटर्सकडून मार्गदर्शन मिळेल आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल.
सॅमसंगच्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहन राव गोली म्हणाले, “सॅमसंगमध्ये आमचा विश्वास आहे की, संधी सर्वसमावेशक असल्यास इनोव्हेशन प्रगत होऊ शकते. कर्नाटकमधील पहिल्या विमेन्स इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी)चे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे, जेथे तरूण विचारवंत एक्स्प्लोअर, प्रयोग करतील आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादांना दूर करतील. सरकारच्या #DigitalIndia व #MakeinIndia मोहिमांशी संलग्न राहत हा कॅम्पस विद्यार्थ्यांना देशामधून तंत्रज्ञान प्रगतीला गती देण्यास सक्षम करतो. आम्ही महिला प्रमुखांना निपुण करण्यास उत्सुक आहोत, जेथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्मिती, नाविन्यता आणि जगामध्ये परिवर्तन घडवून आणतील.”
२०२४ मध्ये सॅमसंग साऊथवेस्ट एशियाने एसआयसी उपक्रमाद्वारे ३,५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, जे २०२३ मधील ३,००० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. सॅमसंगचा आणखी एक उपक्रम सॉल्व्ह फॉर टुमॉरो (SFT) यांसारख्या उपक्रमांतून भारतातील तरुणांना जागतिक टेक लीडर्स बनवण्याचे उद्दिष्ट आहे. जीएसएसएस (आर), म्हैसूरच्या सचिव अनुपमा बी. पंडित म्हणाल्या, “या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना उद्योग-समर्पित शिक्षण आणि प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळेल. डिजिटल कौशल्यांमधील तफावत दूर करून हा उपक्रम महिलांना भविष्यासाठी तयार करेल.”
सॅमसंगने कर्नाटकमधील सात इतर संस्थांमध्येही एसआयसी सुरू केले आहेत, त्यामध्ये बीएनएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केम्ब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. तसेच, आयआयआयटी-कुर्नूल येथेही एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांमधून ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सॅमसंगचा हा उपक्रम भारतातील तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक सक्षम करून देशाला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.