फोटो सौजन्य - सोशल मीडिया
IIT Madras BS Program : जीवनातील अपयश हे तुमची पात्रता ठरवत नसून तुमची पात्रता तुमचे कष्ट आणि प्रयत्नातील सातत्य ठरवते याचे उत्तम उदाहरण संजय आहेत. त्यांनी दाखवून दिले की जर शिकण्याची, बदलण्याची आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असेल तर संकटेही तुमच्या संघर्षापुढे हार स्वीकारतात.
संजय यांनी तीन वेळा NEET परीक्षा दिली, पण त्यांना प्रत्येक वेळी अपयशाला सामोरे जावे लागले. हा असा टप्पा होता जिथे लोक निराशेमध्ये जातात. पण त्यांनी हार न स्वीकारता आयुष्याला नवीन दिशा दिली.
संगणक शास्त्राची (Computer Science) कोणतीही पाश्वभूमी नसताना आणि कोणत्याही JEE स्कोरशिवाय, त्यांनी मद्रासच्या बॅचलर ऑफ सायन्स (BS) इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्समध्ये प्रवेश घेतला. हा एक ऑनलाईन प्रोग्राम आहे, ज्यामध्ये कोणत्याही निश्चित पात्रतेची अट नाही. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला दर्जदार शिक्षण घेता येईल.
आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?
संजय म्हणतात की, मी तीन वेळा नीट नापास झालो तेव्हा सर्वाना वाटले की माझे करियर संपले. पण आज मी असोसिएट डेटा सायंटिस्ट आहे ज्याचे श्रेय IIT मद्रासच्या BS प्रोग्रामला जाते.
या ऑनलाइन प्रोग्रामध्ये त्यांनी पायथन (Python), जावा (Java), SQL, मशीन लर्निंग डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम यांसारखी कौशल्ये आत्मसात केली.
IIT मद्रासचा हा कोर्स चार वर्षाचा असून सर्व वयोगटातील कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीच्या आणि कोणत्याही ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा विचार करून तयार करण्यात आला. यामध्ये उद्योगांशी संबंधित कौशल्ये शिकवली जातात. तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण (practical training) आणि प्रोजेक्ट करून घतले जातात.
या कोर्समध्ये विविध स्तराचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थी कोणत्याही स्तरावर आपल्या सोयीनुसार शिक्षण सोडू शकतात. जेवढे ते कोर्स पूर्ण करतील तेवढे त्यांना क्रेडिट्स मिळतील. त्या आधारावर IIT मद्रासकडून फाउंडेशन सर्टिफिकेट तसेच डिप्लोमा किंवा BSc/BS ची पदवी दिली जाते.
सध्या IIT मद्रास दोन BS प्रोग्राम चालवत आहे.
BS इन डेटासायन्स अँड ॲप्लिकेशन्स
BS इन इलेक्ट्रोनिक सिस्टम्स






