सौजन्य - नवराष्ट्र टीम
3 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेले डॉ. पाटील हे बालरोगतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवत काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरुद्ध लढत दिली. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अतिशय निसटता पराभव झाला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दखल घेत भाजपकडून त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती. मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘लातूर पॅटर्न’ घडवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला,” अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे.
राजकीय पटलावरही डॉ. गोपाळराव पाटील यांचं नाव आदराने घेतलं जातं. मराठवाड्यात जेव्हा भाजपचा पाया रचला जात होता, तेव्हा डॉ. पाटील यांनी खंबीरपणे नेतृत्व केलं. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात अनेकदा कडवी झुंज दिली. १९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा लढवली. विशेषतः १९९८ मध्ये त्यांचा पराभव अत्यंत निसटता होता. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना राज्यसभेवरही संधी दिली होती.






