फोटो सौजन्य - Social Media
युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (UGC)ने विद्यार्थ्यांसाठी एक खास उपक्रम आणला आहे. एखादे काम करण्यासाठी त्या कामाचे कौशल्य अवगत असणे फार महत्वाचे असते. तरुणाईत जेव्हा एखादा मुलगा त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतो, त्यावेळी अशा परिस्थिती मुलांकडे कामाच्या पार्टी जास्त ज्ञान नसते. कामाबद्दल जास्त ठाऊक नसल्याने नवीन मुलं अनेक चुका करतात. याचा परिणाम त्या कंपनीवर तर होतोच त्याचबरोबर त्या तरुणांच्या करिअरवरही होतो. नवीन नोकरी असली तर प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी भीती असते. कारण त्यांचे संपूर्ण वातवरण बदलले असते. अशात एका नवीन वातावरणात प्रवेश करत असताना मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. अनेकदा त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अवतीभवती कुणी नसल्याने मुले भरकटतात. मुळात मुलांचे हेच भरकटणे टाळण्यासाठी UGC ने पाऊल उचलले आहे.
हे देखील वाचा : ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर! ११० शिक्षकांचा होणार गौरव
युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC)ने नवतरुणांमध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी तसेच देशांमध्ये वाढत असणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी NATS 2.0 लाँच केले आहे. NATS 2.0 म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम होय. या योजनेच्या अंतर्गत अनेक तरुणांना फायदा होणार आहे. या योजनेमध्ये तरुणांना नोकऱ्या तर पुरवलेच जाईल त्याचबरोबर त्यांना शिकताही येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये कामाचे कौशल्य वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. त्याचबरोबर इतर नवनवीन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुळात UGC द्वारे आयोजित असलेल्या या यॉर्कनेच मुख्य उद्देश असा आहे कि,” विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रात महारत सध्या करावे आणि योजनेअंतर्गत शिकण्यास मिळणाऱ्या कौशल्यांचा जोरावर आपले करिअर घडवावे.”
हे देखील वाचा : आरआरबीने NTPC पदांसाठी अधिसूचना केली जाहीर; 11,588 पदांसाठी बंपर व्हॅकन्सी
या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच काही गोष्टींमध्ये ही मुदत वाढवण्यात येण्याची अफाट शक्यता आहे. NTS 2.0 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप शोधण्याची संधी मिळेल. या योजनेच्या माध्यमातून पदवीधर, डिप्लोमा होल्डर्स तर प्रोफेशनल प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. ही ट्रेनिंग ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) स्वरूपाची असेल. इच्छुक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी nats.education.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काम पुरवले जाईल तसेच त्यांच्या कौशल्य वाढीवर भर दिला जाईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना कामाचा मोबदलाही पुरवण्यात येणार आहे.