फोटो सौजन्य: Pinterest
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा (RRB)ने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये नॉन टेक्निकल पदांतील विविध पदांचा विचार केला जाणार आहे. भारतीय रेलेव्हमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्ये काम करू इच्छित असणाऱ्या अनेक उमेदवारांची इच्छा पूर्ती केली जाणार आहे. देशात मोठ्या स्तरावर रोजगाराची निर्मिती होणार आहे. यास कारण कि, RRB ने या भरती दरम्यान ११,५८८ रिक्त जागांचा विचार करणार आहे. एकंदरीत, देशांतील एकूण ११,५८८ उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करून करिअर घडवण्याची संधी दिली जाणार आहे.
RRB ने आयोजित केलेल्या या NTPC पदातील रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेसंदर्भात ऑनलाईन अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये भरती संदार्भात महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत. या भरतीच्या सखोल अभ्यासासाठी उमेदवारांनी या अधिसूचनजेचा आढावा घ्यावा. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. परंतु, अद्याप लिंक ऍक्टिव्ह केली गेली नसल्याने उमेदवारांना अर्ज करता येणार नाही आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही दिवसांसाठी वाट पाहावी लागणार आहे. १४ सप्टेंबरपासून उमेदवारांना या अर्ज प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत १३ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आले असल्याने उमेदवारांनी वेळोमर्यादेला पाहून अर्ज मुदतीच्या तारखेअगोदर करावे असे आवाहन RRB ने केले आहे. मुळात, ही भरतीप्रक्रिया पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत ८,११३ पदे ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहे तर ३,४४५ पदे अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी राखीव आहेत. एकंदरीत, एकूण ११,५८८ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; ‘ही’ असेल अर्जासाठी शेवटची मुदत
वर सांगितल्याप्रमाणे, अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी असलेल्या व्हेकन्सीमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तर कोणत्याही मान्यता प्रपात विद्यापीठातून पदवीधार असणाऱ्या उमेदवाराला ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी राखीव व्हेकन्सीमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. RRB ने दोन्ही व्हेकन्सीजसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. उमेदवारांना अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी असलेल्या व्हेकन्सीसाठी किमान वयोमर्यादा १८ असून कमाल वयोमर्यादा ३३ आहे, तर १८ वर्षे ते ३६ वर्षे वय असलेल्या उमेदवारांना ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी असलेल्या व्हेकन्सीसाठी अर्ज करता येणार आहे. निवडीत उमेदवारांना वेतन पदानुसार मिळणार आहे. उदाहरणार्थ, ट्रेन क्लर्कच्या पदासाठी पगार दरमहा 19,900 रुपये आहे, तर कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या पदासाठी वेतन 21,700 रुपये आहे. स्टेशन मास्टरचा पगार 35,400 रुपये आहे.