फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी लाखो तरुण UPSC पात्र करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण ही परीक्षा पात्र करणारे काही शेकडोच असतात. कारण या परीक्षेला पात्र करण्यासाठी अभ्यास तर गरजेचा हवाच त्यापेक्षा जिद्द, कष्ठ आणि इच्छाशक्ती महत्वाची असते. कारण पहिल्याच प्रयत्नात पात्र होणारे कमी आहेत. काही काही तर ७ ते ८ वेळा परीक्षा देतात तेव्हा कुठे त्यांच्या हाती यश मिळते. अशा अनेक प्रेरणादायी कथा आपल्याला ऐकण्यास मिळतात त्यातील एक कथा म्हणजेच IAS अधिकारी राम भजन यांची!
राम भजन राजस्थानच्या एका खेडेगावातील साधारण कुटुंबातील एक साधारण मुलगा! घरातील परिस्थिती इतकी बेताची की सकाळी काही खाल्ले तर रात्री पुन्हा भेटेल की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात यायचा. अन्नाच्या एका घासासाठी त्यांना संघर्ष करावे लागत होते. आपण घरापासून थोड्या अंतरावर जरी चालत गेलो तरीही १०० रुपये अगदी असेच खर्च होतात आणि त्याविषयी आपल्याला फार जाणही राहत नाही. पण राम एकेकाळात अशी परिस्थिती जगत होते की दिवसाला मोलमजुरी करून हाती फक्त १० रुपये मजुरी येत होती.
कोरोना काळामध्ये दम्याच्या आजारात वडील गेले. घराची संपूर्ण जबाबदारी रामावर आली. रामाने नायनाट कष्ट घेतले. मोलमजुरी केली आणि घर चालवले. पण कुटुंबाला सावरायचे असेल तर शिक्षण हाच पर्याय आहे त्यामुळे त्याने UPSC क्रॅक करण्याचा निर्धार घेतला. त्याला स्थानिक पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली. यातून त्याच्या कुटुंबाचा खर्च बऱ्यापैकी निघत होता. परंतु, त्याने पाहिलेले IAS होण्याचे स्वप्न पुर्नबी करण्यासाठी तो फावल्या वेळेत UPSC चा अभ्यास करत असे.
७ वेळा नापास होऊन त्याने आठव्या प्रयत्नात देशभरात ६६७वी रँक मिळवली आणि त्याचा निर्धार त्याने काबीज केला.