फोटो सौजन्य - Social Media
सेमी कंडक्टर लॅबोरेटरी (SCL) तर्फे सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ व कायमस्वरूपी स्वरूपात केली जात असून, एकूण 25 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मे 2025 पासून सुरू झाली असून, 26 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी ज्यांना अर्ज करता आला नाही, अशा इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे, त्यांनी हा लेख नक्की वाचा.
अर्ज करू पाहणार्या उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या भरतीअंतर्गत सहाय्यक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार पात्र मानले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. या पदासाठी निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा असून, त्यानंतर दस्तऐवज पडताळणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. लेखी परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, संगणक, इंग्रजी व चालू घडामोडी अशा विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयासाठी 20 प्रश्न असतील आणि एकूण वेळ 2 तासांची दिली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा करण्यात येतील.
या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹944 इतकं असून, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांसाठी ₹472 इतकं आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावं लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनस्तर 4 नुसार ₹25,500 ते ₹81,100 पर्यंत पगार मिळणार आहे. एकूण 25 जागांपैकी 11 अनारक्षित, 2 ईडब्ल्यूएस, 6 ओबीसी आणि 6 जागा अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या भरतीविषयी अधिक माहिती व ऑनलाइन अर्जासाठी SCL ची अधिकृत वेबसाईट scl.gov.in येथे भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. ही एक सरकारी नोकरीची उत्कृष्ट संधी असून, पात्र उमेदवारांनी ती निश्चितपणे वापरावी.