फोटो सौजन्य - Social Media
तामिळनाडूतील कडलुर जिल्ह्यात राहणाऱ्या सुष्मिता रामनाथन आणि ईश्वर्या रामनाथन दोघे सख्या बहिणी आहेत. मुळात, या दोघांचे नाव आता संपूर्ण देहसभरात गाजत आहे. एका साधारण शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या या दोघी बहिणींनी त्यांच्या शेतकरी वडिलांची मान अभिमानाने ताठ केली आहे. याची ही संघर्षगाथा तरुणांसाठी फार प्रेरणादायी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बहिणींच्या संघर्षविषयी:
आलेल्या त्सुनामीमध्ये या बहिणींचे घराचे पूर्णपणे नुकसान झाले. अशावेळी त्यांच्या कुटुंबाने स्वतःला सावरले. त्याच्या वडिलांनी फार परिश्रम घेत दोघांचे शिक्षण पूर्ण केले. ईश्वर्या रामनाथन या घरातील मोठी मुलगी! तिने अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, तिला या परीक्षेत ६३० वी रँक मिळाली त्यामुळे तिने UPSC पुन्हा देण्याचे ठरवले. दुसऱ्या वेळी ईश्वर्याला ४४वी रँक मिळाली. अशाप्रकारे ईश्वर्या रामनाथन IAS झाली. ती सध्या थुथुकुडी जिल्ह्यात एडिशनल कलेक्टर पदी कार्यरत आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी इतक्या मोठ्या पदी काम करणे आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा पात्र करणे काही सोपी गोष्ट नाही.
सुष्मिता रामनाथन घरातील धाकटी मुलगी! ती सध्या IPS म्ह्णून कार्यरत आहे. पहिल्या पाच प्रयत्नात तिने फक्त अपयश भोगले. पण इतक्या वेळा हाती अपयश आले म्ह्णून तिने कंटाळून स्वप्न टाकून दिले नाही. ती पुन्हा पुन्हा त्याच उमेदीने आणि जिद्दीने उभी राहिली. अपयश आले म्हणून खचून न जाता तिने प्रयत्न सुरु ठेवले. सहाव्या प्रयत्नात तिने तिचे ध्येय गाठले. देशात ५२८व्या रँकने सुश्मिता पास झाली.
एका गरीब शेतकरी कुटुंबातील दोन लेकी इतक्या मोठ्या पदावर जातात, ही बाब फक्त त्याच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गर्वाची बाब आहे. आपल्या बळीराजाला हे सुख मिळणे खरंच गरजेचे आहे आणि त्यांची मुलं त्यांना हे सुख देत आहेत ही बाब फार कौतुकास्पद आहे.