फोटो सौजन्य - Social Media
इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीच्या प्रक्रियेत ४९ इंजिनिअर पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (ITS) सारख्या अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थांची अंमलबजावणी करणे हे या कंपनीचं मुख्य कार्य आहे. सध्या कंपनीने 49 इंजिनिअर (ITS) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती GATE 2025 च्या स्कोअरच्या आधारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2025 पासून सुरू झाली असून 2 जून 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आवश्यक पात्रता:
उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन तसेच डेटा सायन्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाखांपैकी कोणत्याही एक शाखेतून B.E./B.Tech पदवी घेतलेली असावी. त्यासोबतच GATE 2025 मध्ये CS, EC, EE, IN किंवा DA या शाखांपैकी कुठल्यातरी एकामध्ये वैध स्कोअर असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
2 जून 2025 रोजी उमेदवाराचं वय किमान 21 वर्षं आणि कमाल 30 वर्षांपर्यंत असावं. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, माजी सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ GATE 2025 स्कोअरवर आधारित असेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
अर्ज प्रक्रिया:
ही भरती इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे.