फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या सुप्रीम कोर्टात (SCI) कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण ३० रिक्त पदे उपलब्ध असून ही पदे पे लेव्हल ११ अंतर्गत येतात. सुरुवातीचे मूळ वेतन ₹६७,७०० तसेच इतर भत्ते मिळणार आहेत. हे ग्रुप ‘A’ गॅझेटेड पद असून इच्छुक भारतीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये १२० शब्द प्रती मिनिट वेग, संगणकावर ४० शब्द प्रती मिनिट टायपिंग वेग आणि संगणक संचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम (PSUs) किंवा वैधानिक संस्थांमध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी/सीनियर पीए/पीए/सीनियर स्टेनोग्राफर म्हणून किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० ते ४५ वर्षे या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयातील विभागीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेची कोणतीही वरची मर्यादा राहणार नाही.
कायदा पदवीधर (BGL/LLB) उमेदवारांना निवड प्रक्रियेत अतिरिक्त ३ गुणांचे वेटेज मिळणार आहे.
अर्ज शुल्क:
महत्त्वाच्या तारखा:
इच्छुक उमेदवारांनी www.sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करावा. ही भरती stenography आणि shorthand क्षेत्रात अनुभवी व्यावसायिकांसाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.