फोटो सौजन्य - Social Media
टेरीटोरियल आर्मी (TA) ग्रुप मुख्यालय साउदर्न कमांडने आपल्या कार्यक्षेत्रातील विविध इन्फंट्री बटालियनमध्ये भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत सोल्जर (जनरल ड्युटी), क्लर्क आणि ट्रेड्समन या पदांसाठी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. ही रॅली MARATHA LI, PARA, MADRAS, MAHAR, THE GUARDS, GRENADIERS आणि BIHAR रेजिमेंटमध्ये घेतली जाईल.
देशसेवेची इच्छा असलेल्या पुरुष उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवार आपल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ठरवलेल्या केंद्रांवर दिलेल्या तारखेनुसार रॅलीला उपस्थित राहू शकतात. १५ नोव्हेंबरपासून रॅली आयोजित करण्यात आली आहे. तर रॅली १ डिसेंबरपर्यंत समाप्त होणार आहे. उमेदवारांना भरतीसाठी लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
सगळ्यात आनंदाची बात म्हणजे या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही. सर्व प्रवर्गातील उमेदवार थेट रॅलीसाठी सहभागी होऊ शकतात. रॅलीच्या माध्यमातून १४२२ पदे भरण्यात येणार आहेत. 8वी/10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच १८ ते ४२ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्र प्रवर्गातील उमेदवारांना सवलत टेरीटोरियल आर्मीच्या नियमांनुसार दिली जाईल. एकूण पाच टप्प्यांमध्ये उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.
शारीरिक चाचणी (Physical Fitness Test), ट्रेड टेस्ट, वैद्यकीय तपासणी (Medical Examination), लेखी परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणी (Document Verification) या टप्प्यांच्या माध्यमातून ही भरती पार पडणार आहे. इच्छुकांना हे सर्व टप्पे पात्र करावे लागणार आहेत. अर्ज प्रक्रियेची काहीच गरज भासणार नाही. उमेदवारांना थेट रॅलीच्या ठिकाणी येऊन अर्ज करता येणार आहे. फक्त रॅलीकडे येताना ‘शैक्षणिक प्रमाणपत्रे (मूळ व छायांकित प्रती), रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र (असल्यास) तसेच अलीकडील 20 पासपोर्ट आकाराचे फोटो’ या डॉक्युमेंट्सला आणावे. बाकी नियुक्तीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ही भरती जाहीर करता येणार आहे.