काय घडलं नेमकं?
साध्वी प्रेम बाईसा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. त्यांच्या उपचारासाठी एका कंपाउंडरला त्यांच्या आश्रमात बोलावण्यात आले होते. त्या कंपाउंडरने त्यांना एक इंजेक्शन दिले, त्यांनतर त्यांची प्रकृती वेगाने बिघाडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
निधनानंतर ४ तासांनी सोशल मीडियावर पोस्ट
साध्वींच्या निधनानंतर साधारण ४ तासांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यात अग्निपरीक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. आता प्रश्न असा की त्यांचा तर मृत्यू झाला मग ही पोस्ट कोणी शेअर केली? ही पोस्ट म्हणजे आत्महत्येचे संकेत आहेत की त्यांना काही सुचवायचे होते, अशी चर्चा होता हाये. याचा तपास आता पोलीस करत आहे.
खासदार हनुमान बेनीवाल यांची आक्रमक भूमिका
नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट केली आहे. पोस्ट करत म्हटले की, “जोधपूरच्या रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. ही घटना सामान्य वाटत नाही, याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे.
तपास आणि पोस्टमार्टम
साध्वींच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्राथमिक चौकशीत तापाचे कारण सांगितले जात आहे. मात्र खासदार बेनीवाल यांचा दावा आणि सोशल मीडियावरील गूढ पोस्टमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आता काय नेमकं कारण समोर येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६ महिन्या पहिले झ होता व्हिडीओ वायरल
साध्वी प्रेम बाईसा यांचा जुलै २०२५ मध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यात एका पुरुषाला मिठी मारतांना दिसत होत्या. या व्हिडीओवरून त्यांच्या चारित्र्यवर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर साध्वींनी स्पष्टीकरण दिले होते की, “तो व्हिडिओ जुना असून मी माझ्या वडिलांना मिठी मारत होते. मला बदनाम करण्यासाठी आणि २० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला.”
त्यांनतर पोलीस तपासात या प्रकरणाचा खुलासा झाला. हा व्हिडीओ साध्वींचा माजी कर्मचारी जोगेंद्र, ड्रायव्हर रमेश आणि अन्य काही जणांनी मिळून व्हिडीओ व्हायरल केला होता. जोगेंद्रने वैयक्तिक रागातून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. यांनी साध्वीला आधी २० लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती दिली नाही म्हणून व्हिडीओ व्हायरल केला होता.
Ans: जोधपूरमधील एका रुग्णालयात.
Ans: त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मृत्यूनंतर पोस्ट शेअर होणे.
Ans: नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी.






