हत्येचा संशय
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांच्या घरातून कुजल्याचा वास येत असल्याने गावातील काही नागरिकांनी त्यांचा घर उघडला. त्यांना घरात जे दृश्य दिसले ते पाहून त्यांना धक्काच बसला. महादेव कांबळे व त्यांच्या पत्नीचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना या प्रकरणात हत्येचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेनसिक टीम, फिंगर प्रिंट एक्सपर्टसह डॉगस्कॉड टीमला पाचरण केलंय. या घटने मागचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व म्हसळा पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
रायगड म्हसळा नगर पंचायत प्रभागात मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांच्या सात विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विकास कामांमुळे गावकऱ्यांना विविध सोयीसुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. त्यामुळे या विकासकामांसाठी गावकऱ्यांनी देखील आनंद व्य़क्त केला आहे.
विकासकामांमध्ये प्रामुख्याने जुने रजिस्टर ऑफिस आणि जवळील परिसर या दरम्यानच्या रस्त्याचे लोकार्पण,राधाकृष्ण मंदिर ते रमेश जैन यांचे बिल्डिंग या दरम्यान बांधलेल्या गटाराचे लोकार्पण,प्रभाग क्र. ४ मधील अल्ताफ दफेदार ते मुकादम चाळीपर्यंत हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन,प्रभाग क्र. ४ मधील मन्सूर दरोगे ते इम्तियाज दफेदार यांच्या घरापर्यंत हायमास्ट दिवे बसविण्याचे भूमीपूजन,आदिवासीवाडी येथे बांधलेल्या धूप प्रतिबंधक संरक्षण भिंतीचे लोकार्पण,हिंदू स्मशानभूमीच्या विद्युतीकरण कामाचे भूमीपूजन,तसेच सावर गौळवाडी मुख्य रस्त्यालगत (नदीशेजारी) बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण यांचा समावेश आहे.
Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…






