जेऊरला २०० किलो गोमांस पकडले, एमआयडीसी पोलिसांचा छापा; धार्मिक स्थळाशेजारी कत्तलखाने
मिळालेल्या माहितीवरून तात्काळ जेऊर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंडे, पोहेकॉ. सुशांत दिवटे, आजिनाथ पालवे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तांदळे यांनी घटनास्थळी जाऊन मुनीर खैरू शेख याच्या घरावर छापा टाकला. सदर ठिकाणी मोहसीन मुश्ताक शेख (रा. भिंगारकॅम्प, अहिल्यानगर) हा राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला. कत्तलीसाठी लागणारे साहित्य तसेच २०० किलो गोमांस सदर ठिकाणी मिळून आले.
मोहसीन शेख यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल हा मुनीर सौरु शेख (रा. जेऊर बायजाबाई ता. जि. अहिल्यानगर) याच्या मालकीचा असले बाबत माहिती दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून धार्मिक स्थळा शेजारी सुरू असणाऱ्या गोवंशीय जनावरांचे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या पायथ्याशी अवैधपणे गोवगीय जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याचा होता,
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील होत होती. धार्मिक स्थळा शेजारीच गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याने नागरिकामधून नानाजी देखील व्यक्त केली जात होती. आजच्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तसेथ कारवाई मध्ये सातत्य ठेवण्याची मागणी ही नागरिक करत आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी गोवंशीय जनावरांच्या कत्तलीविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंडे, आदिनाथ पालवे, सुशांत दिवटे, ज्ञानेश्वर तांदळे, शुभम सुटुक, सुरज देशमुख यांच्या पथकाने केली.






