नवी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, 34 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल
सावन वैश्य, नवी मुंबई: गेल्या महिन्याभरापासून एअरलाइन्स आणि ट्रेन बॉम्बच्या धमक्या वाढत असतानाच्या ऐकायला मिळत होत्या. अशातच आता नवी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत पोलिसांना धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर आली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याबाबतचा फोन नियंत्रण कक्षाला मिळाल्यावर पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोड मध्ये आली. यानंतर पोलिस व तपास करून खोटी माहिती देणाऱ्या 34 वर्षे युवकास पोलिसांनी घणसोली मधून ताब्यात घेतले आहे. या नवी मुंबई शहरात विविध जात, धर्म, पंथ, वर्गाचे लोक राहतात. त्यामुळे या शहराला प्रति भारत म्हणून देखील संबोधले जाते. तसेच अतिशय शांतता प्रिय शहर म्हणून देखील या शहराकडे पाहिले जाते. या शहराची शांतता अशीच अखंड नांदत राहावी यासाठी नवी मुंबई पोलीस कटीबद्ध असून, वेळप्रसंगी कठोर कारवाई करून शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांच्या मुस्क्या आवळण्यात कोणतीही कुचराई करत नाहीत. अशाच प्रकारची कारवाई करत एका 34 वर्षीय युवकाच्या पोलिसांनी घणसोलीतून मुस्क्या आवळल्या आहेत.
video Call वर महिलेला कपडे काढायला लावले, नंतर 1.78 लाखांची फसवणूक केली; मुंबईतील धक्कादायक प्रकार
1 डिसेंबरच्या पहाटे सव्वा पाच च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षा ला फोन द्वारे कळविण्यात आले की, नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. या फोन कॉल नंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी संपूर्ण यंत्रणे सह कामाला लागले. तसेच फोन करणारा इसमाचा शोध एक पथक करत असताना, सदरचा फोन हा ख्रिस्तोफर अँथोनी डायस, वय 34 वर्ष, राहणार घनसोली यांनी केला असल्याची माहिती मिळताच, पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून ख्रिस्तोफर याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याने मध्य प्राशन करून पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ब्लास्ट संदर्भात खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले. ख्रिस्तोफर विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
या आधी देखील शहरात विविध ठिकाणी बॉम्ब असल्याचे खोटे फोन पोलीस यंत्रणेला प्राप्त झाले होते. मात्र सक्षम नवी मुंबई पोलीस हे संपूर्ण यंत्रणेसह मैदानात उतरून मिळालेल्या माहितीची सहानिशा करून, खोटी माहिती देणाऱ्या इसमा बाबत काही तासातच माहिती काढून त्या इसमाच्या मुस्क्या आवळण्यात यशस्वी देखील झालेले पाहायला मिळाले आहे.
KDMC कामगाराच्या कुटुंबांला जीवे ठार मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?