Photo Credit- Team navrashtra
पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पुण्यातील सरकारी वकील प्रविण चव्हाण, तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, तसेच सध्या निवृत्त असलेल्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्याविरुद्ध कट रचण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने(सीबीआय) हा गुन्हा नोंदवला असून, जळगावमधील अपहरणप्रकणाचा केलेल्या तपासानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मोक्का कारवाई करण्याचा प्रयत्न केलाजात असल्याचे समोर आले आहे.
तत्पुर्वी फडणवीस यांनी विधीमंडळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्हदेखील सादर केला होता. याघटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. तीन-चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख आणि प्रविण चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा:अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नागरिकांनी चोप देत गाठलं पोलीस स्थानक
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने त्यंच्यावर नवा एफआयआर दाखल केला होता. पण जळगावातील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज लिमिटे या संस्थेवरून नीलेस भोईटे विरुद्ध ॲड. विजय पाटील या प्रकरणाला कोणताही आधार नाही. हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे कारस्थान सुरू केल्याचा आरोप अनिल देशमुख यांना होता. तसेच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात विकृ राजकारण सुरू केलं आहे. अशी टीकाही त्यांनी केली होती.
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात बसण्यात आलेल्या घड्याळाच्या कॅमेर्यातून यासंबंधीचे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आल्याचा दावाही फडणवीसांनी केला होता. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणात आता सीबी आयने या सर्व मंडळींवर गुन्हे दाखल केले आहेत.
हेदेखील वाचा: हाहाहा! तरूण रिमोट कंट्रोल कार घेऊन पार्किंगमध्ये अन्…,पुढे जे झाले ते पाहून हसूनहसून लोटपोट