ठाणे (अंबरनाथ) : बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता, राज्यामध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर सुद्धा अनेक घटना समोर आल्या होत्या. त्याचबरोबर कोलकतामधील डॉक्टरसोबत झालेल्या निघृण घटनेनंतर राज्यामध्ये संतापाचं वातावरण होत. त्यामुळे सध्या देशामध्ये दूषित वातावरण पसरलेलं आहे. निकृष्ठ दर्जाच्या बुद्धिमतेच्या लोकांच्या त्याचबरोबर त्याच्या वागणुकीमुळे कित्येक अल्पवयीन मुलीच्या आयुष्य खराब होत आहे. आरोपीना कठीणातील कठीण शिक्षा द्यावी अशी नागरिकांची इच्छा आहे. आता अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिनी ७ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हेदेखील वाचा – सलमान खान आणि भाचीच खास नातं! अर्पिता खानच्या मुलीसोबत केली गणरायाची आरती
अंबरनाथ पूर्वेच्या शिवजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने नागरीकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये आरोपीवर विनयभंग सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यामध्ये काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक प्रकारे समोर आले आहेत, परंतु राजकीय कार्यकर्त्यांमुळे त्या घटनेच मूळ कारण लपवलं जात आहे. राज्यामध्ये दोन मुलीची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली होती, काही दिवस या घटनांवर चर्चा झाली त्यानंतर त्या घटनेंकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासन सुद्धा त्याला पडद्यामागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याणमध्ये एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आली होती, नवी मुंबईमध्ये एका मुलीची हत्या करून दिला टाकले होते. यामधील एकही महिलेवर किंवा मुलीला न्याय देण्यात आला नाही, त्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.