संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात वैमनस्यातून तरुणावर टोळक्याने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
दिनेश विश्वकर्मा (वय २४, रा. शिवणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राज अनिल ठाकूर (वय १९), ॲलेक्स अरुण अँथोनी (वय २४) , निखील ठाकूर (वय २२), प्रकाश प्रेमबुडा (वय २०), साहिल राजेंद्र वाघमारे (वय २१, सर्व रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता) यांना अटक केली आहे. याबाबत विनोद थापा (वय २३, रा. उत्तमनगर) याने उत्तमनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश प्रेमबुडा व दिनेश विश्वकर्मा मूळचे नेपाळचे आहेत. दोघांचे कुटुंबीय उत्तमनगर भागात राहत आहेत. दीड महिन्यांपूर्वी दोघांत वाद झाला होता. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवणे परिसरातून जात होते. तेव्हा विश्वकर्माला आरोपी प्रेमबुडा आणि साथीदारांनी गाठले. त्याच्यावर शस्त्राने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील विश्वकर्माला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी दुपारी विश्वकर्माचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन खंदारे यानी दिली. पसार झालेल्या पाच आरोपींना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक खंदारे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘ती’, सुरक्षित नाही! सव्वा महिन्यात सव्वाशे विनयभंग अन् अत्याचाराच्या तब्बल…
पुतण्याने केला चुलत्याचा खून
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.