संग्रहित फोटो
गगनबावडा : हंगाम गाळपासाठी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज असून शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे व गळीत हंगाम यशस्वी करावा. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेने खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुटमार करु नये, कोणाची तक्रार असल्यास शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा २३ व्या गळीत हंगाम नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकली. संचालक अभय बोभाटे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. प्रथम ऊस घेऊन आलेल्या वाहनधारकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशिल घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, उदय देसाई, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, समीर सावंत, मेघनाथ धुरी, रविंद्र मडगावकर, प्रज्ञा ढवण, गणपत देसाई, गोकुळ संचालक बयाजी शेळके, माजी जि. प. सदस्य संभाजी पाटणकर, भगवान पाटील, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्थायी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी केले तर आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मानले.
डी. वाय. पाटील कारखान्याचा ३४५० ऊसदर जाहीर
‘कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू हंगामात कारखाना पहिल्या उचलीपोटी प्रति टन ३४०० रुपयाप्रमाणे पहिली उचल दिली जाईल. कारखान्याचे साडेपाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे.
दुसऱ्या हप्त्याची परंपरा कायम ठेवणार
कारखाना गत अनेक गळीत हंगामात दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता आदा करत आहे. दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता ५० रुपये प्रमाणे आदा करुन त्यांची दिवाळी गोड केली जाते. ही परंपरा यापुढे कायम ठेवणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.






