(फोटो- istockphoto)
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोज राज्याच्या विविध भागात घडत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडली आहे. जळगाव बारा वर्षीय अल्पवयीन अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ही घटना घडली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वीरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून परतत असताना बारा वर्षीय एका मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने दगडाने ठेचून त्या १२ वर्षीय मुलीची हत्या केली. त्या मुलीची दगडाने हत्या केल्यानंतर मुलीला घटनास्थळावरून काही फूट ओढत नेऊन कापसाच्या शेतात फेकून दिले.
मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर काही वेळाने एका शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावकर्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चोपडा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे एका शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिपायाने अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. त्यातील आरोपीला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक कऱण्यात आली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर खुनाचा, बलात्काराचा प्रयत्न आणि पोक्सो कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश दिले आहेत. तसेच संस्थाचालकावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.