शिक्षकाने काढली विद्यार्थिनीची छेड (फोटो- istockphoto )
ही बाब समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक करा, असे आदेश दिले आहेत. यानंतर स्थानिक प्रशासनानेही तातडीने हालचाल करत शिक्षक नसीर मुल्ला याचे निलंबन केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडूनही घटनेची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बालकांचे संरक्षण आणि शाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकांनी शाळा प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
महाराष्ट्रात एक अतिशय क्रूर आणि लज्जास्पद घटना घडली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर काही वारकऱ्यांना अडवून लुटल्याचा प्रकारही समोर आला आहे. सध्या राज्यात वारक्यांची पावले लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे. अशातच वारीत जाणाऱ्या एका मुलीसोबत गैरकृत्य घडल्याने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली आहे.
Pandharpur Crime : वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे जाणारे दोन वारकरी वाटेच चहासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या जवळ दुचाकीवरून दोन जण आले आणि थांबले.धाकदडपशाही करुन त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला, यानंतर संशयित लुटारुंनी दोन वारकऱ्यांना लुबाडले. यानंतर ते पुढे निघाले. त्यानंतर त्यांनी एका अल्पवयीन मुलीला गाठले. या मुलीला त्यांनी काही अंतर दूर नेत एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले.