एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता नागपुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या तरुण मुलीवरही लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाहीतर दोघींची मोबाईलद्वारे आक्षेपार्ह चित्रफित काढली. नंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! आश्रमातील सेवेकरी मुलीवरच सामूहिक अत्याचार; सख्ख्या मामानंही सोडलं नाही
आरोपी हा चालक आहे. पीडित महिला दोन मुलींसह जरीपटका परिसरात राहते. सुमारे 10 वर्षांपूर्वी पीडित महिलेची आरोपीसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण करू लागला. दरम्यान, त्याने महिलेच्या 20 वर्षीय मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचेही लैंगिक शोषण सुरू केले. मोबाईलने दोघींसोबतही केलेल्या कृत्याची चित्रफीतही काढली. ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तो दोघींचे लैंगिक शोषण करत होता.
दरम्यान, त्याने नंतर पीडितेच्या या आक्षेपार्ह व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्या. ती त्याच महिलेच्या लहान मुलीला दिसली. तिने आई व बहिणीला याबाबत सांगितले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिलेने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.
42 वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल
अत्याचाराची ही संतापजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 42 वर्षीय प्रियकराविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
आश्रमात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
आणखी एका घटनेत, एका आश्रमात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. ही धक्कादायक घटना (दि.19) उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी प्रथम रिद्धपूर येथील मठाचे प्रमुख सुरेंद्रमुनी तळेगावकर, बाळकृष्ण देसाईसह पीडित मुलीच्या मावशीला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणातील चौथा आरोपी हा पीडितेचा मामा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला (दि. 20) गुरुवारी अटक केली.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
दुसरीकडे, इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना केल्याचे उघडकीस आली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार (दि. ७) रोजी उघडकीस आले आहे.
हेदेखील वाचा : Karjat News: ‘ती’ च्या मृत्यूला एक महिना पूर्ण तरीही अद्याप गुन्हा दाखल नाही, आदिवासी कुटुंबाला सरकार न्याय देणार का?