'ती' च्या मृत्यूला एक महिना पूर्ण तरीही अद्याप गुन्हा दाखल नाही, आदिवासी कुटुंबाला सरकार न्याय देणार का?
संतोष पेरणे, कर्जत: पेण तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षाच्या खुशबू नामदेव ठाकरे या चौथीमध्ये शिक्षण घेत असल्याच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद रित्या चुकीच्या औषधे यांच्यामुळे झाला आहे. त्या घटनेला आज (23 फेब्रुवारी) एक महिने पूर्ण झाला असून या एका महिन्याच्या कालावधीत शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केलेली नाही. दरम्यान, शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून एक महिन्यानंतर देखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून पुढे पेण पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत कि नाही असा प्रश्न स्वयंसेवी संस्था यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
बोरगाव ग्रामपंचायत मधील तांबडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले. मात्र सुदृढ असलेल्या खुशबूला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले आणि कुष्ठरोगावरील औषधे दिली गेल्यावर त्या औषधांचे साइड इफेक्ट खुशबुचे अंगावर दिसून लागले होते. १८ डिसेंबर रोजी कुष्ठरोगावरील औषधे देण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसांनी ताप येणे, अंगावर फोडी येणे,अंग सुजणे आदी प्रकार दिसून येऊ लागले आणि नंतर २२ जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभर या प्रकरणाची नोंद जाहीर कुठेही झाली नव्हती, मात्र प्रसार माध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढले आणि खुशबू मृत्यू प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वरवणे शासकीय आश्रमशाळेतील खुशबु नामदेव ठाकरे या नऊ वर्षाच्या मुलीच्या मृत्यूची नोंद आकस्मीक मृत्यू अशी करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये दाखल झालेल्या या आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी जाबजबाब घेतले मात्र त्या बदलाचा गुन्हा दाखल व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला आहे.
दुसरीकडे खुशबूला कुष्ठरोगी ठरवल्यावर आरोग्य विभागाने तिची बायप्सी करण्याची गरज आरोग्य विभागाला का भासली नाही असा प्रश्न संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. संतोष ठाकूर यांनी या प्रकरणी सरकार आपल्या अधिकारी कर्मचारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. खुशबूच्या मृत्यूला दोन महिने झाले तरी शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यपक, अधीक्षक,प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागावर कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला असून शासनाच्या अशा भूमिकेमुळे शासकीय आश्रमशाळेवरील आदिवासी लोकांचा विश्वास उडण्याची शकयता अधिक आहे. याच शाळेतील एका मुलीच्या अचानक गायब होण्याच्या प्रकारणांनंतर खुशबूचा चुकीच्या औषधे दिल्याने मृत्यू झाल्याने आदिवासी समाजामध्ये घाबरत पसरली आहे. आगामी काळात अशा काही प्रकरणात संबंधित यांच्यावर कायद्याची करावी झाली नाही तर कदाचीत आदिवासी समाजातील लोक आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेण्यासाठी पाठवणार देखील नाहीत अशी भीती आदिवासी लोक व्यक्त करीत असल्याचे संतोष ठाकूर यांनी मत मांडले आहे.
सामाजिक कार्यकर्ते
खुशबू ठाकूर या चिमुरडीचा मृत्यू चुकीच्या औषधे दिल्याने झाला आहे असे आपले ठाम मत आहे. त्यामुळे शासनाने अधिक वेळ न घेता या प्रकरणी आदिवासी आश्रमशाळा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून झालेला हलगर्जीपणा यांचा विचार करून तात्काळ कारवाई करावी आणि जनतेच्या मनात निर्माण झालेला असहकाराची भावना कमी करण्याचा प्रयत्न करावा.
आम्ही शासनाला लेखी पत्र देऊन आदिवासी विकास विभागाने खुशबू मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शासन या महिन्याच्या अखेर पर्यंत खुशबुच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करणार नसेल तर मार्च महिन्याची आमची संस्था पेण येथे प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल असा इशारा अध्यक्ष जनजागृती आदिवासी विकास संस्था जैतू पारधी देत आहोत.