फोटो- istockphoto
अकलूज: माळशिरस पंचायत समिती बांधकाम उप विभागातील कनिष्ठ अभियंता शशिकांत सयाजी चौगुले रा. माळीनगर, ता. माळशिरस, पन्नास हजाराची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात गुरुवार दि. 16/01/2025 रोजी दुपारी अडकलेला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस अधीक्षक . शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपअधीक्षक शितल दानवे, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
माळशिरस पंचायत समिती येथे लाचखोर शशिकांत सयाजी चौगुले यांनी तक्रारदार यांना एक लाख रुपये लाचेची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे मोजमाप व बिले काढण्याकरता पैशाची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी पन्नास हजार रुपये दिल्यानंतर अँटी करप्शन यांनी त्यांना जाळ्यात अडकवले. त्यामुळे माळशिरस पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आज गुरुवार असल्याने माळशिरस पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी उपस्थित असतात. भर दुपारी अँटी करप्शन यांनी लाचखोर शशिकांत सयाजी चौगुले यांना अडकविल्यानंतर पंचायत समिती मोकळी झालेली होती. लाचलुचपत प्रतिबंधक अँटी करप्शन सापळा विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार शेलार, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माने, पोलीस नाईक किरण चिमटे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे गुन्हा नोंद करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे.
तलाठ्यासाठी लाच घेणं भोवलं; सापळा रचून एकाला रंगेहात पकडले
राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं आता फुरसुंगीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एकाने जमीन खरेदी केली होती. तक्रारदारांना मिळकती संदर्भातील फेरफार आणि सातबारा नोंदणीचे काम शासकीय पत्राद्वारे तक्रारदारांना देण्यात आले आहेत. या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. तक्रारदार फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी तलाठी कार्यालयात वावर असलेला दलाल आरोपी ठकसेन गलांडे याने तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर नोंदीचे काम करुन देतो. त्यसाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले.
हेही वाचा: तलाठ्यासाठी लाच घेणं भोवलं; सापळा रचून एकाला रंगेहात पकडले
चारशे रुपयांची लाच घेणे अंगलट
राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणतीही त्रुटी काढल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ ओनरशिप) करून देण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने 400 रुपयांची लाच मागितली. दलालाच्या माध्यमातून पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने दोघांनाही पकडले.