Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
VPN च्या सर्वात मोठया फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर याची प्रायव्हसी आणि सिक्योरीटी अधिक चांगली आहे. VPN मुळे तुमचे लोकेशन, IP एड्रेस आणि ब्राउजिंग एक्टिविटी लपवले जाऊ शके, ज्यामुळे वेबसाइट, ब्राउजर आणि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स इत्यादी लोकं ही माहिती ट्रॅक करू शकत नाहीत. सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर VPN तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट करतो, तुमची वैयक्तिक माहिती आणि इतर डेटा संरक्षित करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर एखाद्या खास वेबसाईट किंवा खास वेळेस इंटरनेट स्पीड स्लो झाली असेल तर बँडविड्थ थ्रोटलिंगचे प्रकरण असू शकते. VPN या समस्येवरील उपाय आहे. VPN तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट करतो, ज्यामुळे तुम्हाला जलद इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येतो. यामुळे तुम्ही इंटरनेटवर अगदी फास्ट ब्राऊझिंग करू शकता.
VPN तुमचा आयपी एड्रेस बदलतो. ज्यामुळे असं वाटतं की यूजर्स एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून इंटरनेट एक्सेस करत आहेत. यामुळे, तुम्ही कोणत्याही भागात ब्लॉक केलेले चित्रपट किंवा टीव्ही शो इत्यादी देखील पाहू शकता.
जर तुम्ही परदेशात फिरायला गेलात तर VPN तुमच्यासाठी आणखी फायद्याचं ठरणार आहे. अनेक देशांमध्ये सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातलेली असते. त्यामुळे तुम्ही जर अशा एखाद्या ठिकाणी असाल तर VPN चा वापर करून तुम्ही सोशल मीडिया अॅप्स अॅक्सेस करू शकणार आहेत.
तिकीट बुक करताना, तुमच्या लोकेशननुसार किमती बदलू शकतात. सहसा या किंमती जास्त असू शकतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही VPN चा वापर करू शकता. हे लोकेशन बेस्ड किंमती वाढण्यापासून रोखेल आणि तुम्हाला बचत करण्यास अनुमती देईल.
अशा प्रकारे VPN तुम्हाला अनेक कामांत फायदेशीर ठरणार आहे. याचा वापर करून तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा अधिक वाढणार आहे.
Ans: नो-लॉग्स पॉलिसी, वेगवान सर्व्हर, मजबूत एन्क्रिप्शन असलेला VPN निवडा. (ब्रँड बोट चोसेंटाना पुनरावलोकने तपासा)
Ans: पब्लिक Wi-Fi किंवा संवेदनशील कामांसाठी VPN ON ठेवणे चांगले. सामान्य वापरासाठी गरजेनुसार वापरा.
Ans: होय. काही VPN Netflix, Prime Video, YouTube साठी वेगवेगळ्या रीजनचा कंटेंट दाखवतात.






