धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. अशी प्राथमिक माहिती आहे. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मेनी केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्राकर दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अहिल्यानगर हादरलं! क्रिकेटच्या वादातून आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्याचा चाकूने खून