4 वर्षीय मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून आई संतापली, गरम लोखंडी चमच्याने दिले चटके (फोटो सौजन्य-ChatGPT)
Kerala Crime News in Marathi : आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती असते. आईशिवाय घरच नाही तर आयुष्यही अपूर्ण आहे. आई तिच्या मुलाला तिच्या पोटात ठेवण्यापासून ते आयुष्यभर आपल्या मुलाचे लाड करताना पाहिले. पण केरलामधून अशी एक बातमी समोर येते, ज्यामुळे आई या शब्दाबरचा विश्वास उडून जाईल. केरळच्या अलेप्पी जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे. एका मुलाने चुकून त्याच्या पँटमध्ये शी केली. हे पाहताच आई इतकी अस्वस्थ झाली की तिचा राग अनावर झाला. मग तिने असे काही केले की आई आहे की हैवान… असं बोलायची वेळ आली.
आईने पोटच्या मुलाच्या चटके दिले. मुलाच्या पायांवर आणि पाठीच्या खालच्या भागात जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. सुरुवातीला मुलाची आई रुग्णालयात खोटे बोलत होती. पण तिच्या सासरच्या मंडळींनी मुलासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सत्य समोर आले. ही घटना केरळच्या एका गावात घडली आहे.
22 सप्टेंबर 2025 रोजी एक चार वर्षीय मुलगा खेळत होता. खेळता खेळत त्याला शौचालयाची कळ आली, पण शौचालयात पोहचण्यापूर्वीच त्या चार वर्षीय मुलाकडून पँटमध्ये शी झाली. मुलाने पँटमध्ये शी केली, हे पाहताच आईचा राग अनावर झाला. तीने रागाच्या भरात स्वयंपाकघरातून एक गरम लोखंडी चमचा उचलला आणि मुलाच्या पाठीवर आणि पायाला चटके दिली. मुलगा वेदनेने ओरडत राहिला, पण आई स्थिर राहिली. तिने तिच्या लज्जास्पद कृत्याला लपवण्यासाठी खोटी कहाणी रचली.
दुसऱ्या दिवशी, जेव्हा मुलाची प्रकृती बिघडू लागली. तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे आईने डॉक्टरांना सांगितले की मूल चुकून गरम चमच्यावर बसला त्यामुळे त्याला ज्यामुळे भाजले. पण सत्य जास्त काळ लपून राहू शकले नाही. मुलाच्या सासरच्यांनी रुग्णालयात हा खोटारडेपणा उघड केला आणि पोलिसांना कळवले. कनकाकुन्नू पोलील ठाण्याने ताबडतोब कारवाई केली आणि आईला अटक केली.
पोलिसांनी बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आता मुलाची तब्येत ही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. मुलाच्या आजी-आजोबांनी आईला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.