काय नेमकं प्रकरण?
पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय श्यामला नावाच्या महिलेने तिच्या २२ वर्षीय जयप्रक्रश रेड्डी नावाच्या मुलाला मारून टाकण्यासाठी ६ लाख रुपये देऊन एका कॉन्ट्रॅक्ट किलर टोळीला कामावर ठेवलं होतं. श्यामलाने तिच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असलेल्या महेश नावाच्या शेतमजूरी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या मुलाला मारण्यास सांगितलं. तिने त्याला 50,000 रुपये अडवान्स्ड दिले. त्यानंतर, 7 नोव्हेंबर रोजी जयप्रकाशचा मुंबई-चेन्नई महामार्गालगत गुल्लापल्ली येथील एका दारूच्या दुकानाजवळ आढळला.
सुरुवातीपासून हा मृत्यू संशयास्पद असल्याचं मानलं गेलं, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तैनात केल्यानंतर तपासाला गती मिळाली. त्यानंतर पीडित तरुणाची ओळख पटवण्यात आली. निरीक्षक गोपाल रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशच्या मोबाईल फोनवरून श्यामलाला आलेल्या कॉलवरून घटनेचं सत्य उघडकीस आलं. या घटनेत महेशसह त्याचे साथीदार सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात श्याम, महेश आणि इतर सहा जणांना अटक केली.
हत्या करण्यामागचं कारण काय?
जयप्रकाश हा एमबीएचा विद्यार्थी होता आणि काही काळापूर्वी त्याला दारूचं व्यसन लागले होते. तो त्याच्या आईकडे दारूसाठी सतत पैसे मागायचा. यामुळे श्यामला आपल्या मुलाच्या वैगण्याला अतिशय वैतागली होती.
Ans: आई
Ans: 6 लाख
Ans: 22






