गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाई; सी-60 कमांडोंकडून भामरागडजवळील तळ उद्ध्वस्त
Gadchiroli News: देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. भामराकडजवळ नक्षलवाद्यांनी उभारलेला तळ सी-60 कमांडो पथकाने उद्ध्वस्त केला. या कारवाईत नक्षलवाद्यांचे शस्त्रसाठा, स्फोटके आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कवंडे जंगल परिसरात करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष मोहिमेसाठी रवाना झाले होते. आज सकाळी जंगलात शोधमोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत तीन ठिकाणी जवळपास दोन तास चकमक केली.
“पाकने पुन्हा हल्ला केल्यास, आम्ही…”; इंडियन एअरफोर्सने शत्रूला दिला निर्वाणीचा इशारा; पहा VIDEO
चकमकीनंतर परिसरात केलेल्या झडतीत एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, रेडिओ सेट, वॉकीटॉकी चार्जर आणि तीन पिट्टू (सामानाची पिशवी) असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. गडचिरोलीतील ही कारवाई अत्यंत यशस्वी ठरली असून, नक्षलवाद्यांच्या हालचालींना मोठा धक्का बसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सी-60 कमांडोंनी भामराकडजवळील नक्षली तळ उद्ध्वस्त
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. भामरागड तालुक्यातील कवंडे जंगलात उभारलेला नक्षलवाद्यांचा तळ सी-60 कमांडोंनी उद्ध्वस्त केला. आज सकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास चाललेल्या या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके आणि नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोपनीय माहितीच्या आधारे 200 सी-60 जवान मोहिमेत सहभागी होते. पोलिसांनी ही कारवाई यशस्वी ठरल्याचे सांगितले असून, नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे.
भामरागडजवळ सी-60 कमांडोंनी केलेल्या जोरदार कारवाईनंतर माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. चकमकीदरम्यान काही नक्षलवादी ठार किंवा गंभीर जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, काही जखमी माओवादी जंगलाच्या आडभागात पसार झाल्याचा संशय असून, त्यांच्या शोधासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
जोडीदार असावा तर असा! शॉक लागून हात गमावले तरीही तिने सोडली नाही साथ…; तरुणाने घेतलेला उखाणा व्हायरल
सी-60 कमांडोंसह इतर सुरक्षा पथकांचे ऑपरेशन अद्याप सुरू असून, जंगल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माओवाद्यांचा पुनर्प्रवेश किंवा नव्याने घातपात होऊ नये यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जवानांनी जंगलातील प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केलं आहे.
या कारवाईमुळे गडचिरोलीतील नक्षल चळवळीच्या मुळावर प्रहार झाला असून, स्थानिक नागरिकांमध्येही पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही धडक मोहीम केवळ एक लष्करी यश नसून, महाराष्ट्र पोलिसांच्या धाडस, काटेकोर नियोजन आणि देशनिष्ठेचे प्रतीक ठरत आहे. नक्षलविरोधी लढाईला ही कारवाई नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.