भारतीय लष्कराची पत्रकार परिषद (फोटो- ani)
नवी दिल्ली: भारताने पहलगाम हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा बीमोड केला आहे. पाकिस्तानचे अनेक हल्ले भारताने परतवून लावले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती भारतीय सैन्य दल नागरिकांना देत आहे. डिजीएमओतर्फे पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. दरम्यान इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई करण्यासाठी एकदम तयार असल्याचे डिजीएमओ यांनी सांगितले. आज राजधानी दिल्लीत ऑपरेशन सिंदूरविषयी लष्कराची दुसरी पत्रकार परिषद घेतली आहे. भारतीय लष्कराचे डिजीएमओ राजीव घई, नौदलाचे डिजीएमओ एएन प्रमोद, आणि वायुसेनेचे डिजीएमओ अवधेष कुमार भारती यांनी पत्रकार परिषद घेतली.
#WATCH | Delhi | #OperationSindoor | On being asked about the message being conveyed by using Ramdhari Singh Dinkar's poem in the video presentation, Air Marshal AK Bharti says, "…'विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति'.." pic.twitter.com/WBDdUI47oX
— ANI (@ANI) May 12, 2025
दरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत पहिल्या पत्रकार परिषदेआधी शिव तांडव स्तोत्र लावण्यात आले होते. आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रकवी राम धारी दिनकर यांच्या “याचना नहीं अब रण होगा, जीवन जय मरण होगा” या कवितेने झाली. तर तुर्की ड्रोन पाडण्यात आले यावर प्रश्न विचारले असतं एअर मार्शल भारती म्हणाले, “यासाठी मि तुम्हाला रामचरित मानस मधील काही ओळी ऐकवेन. “विनय ना मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत बोले राम सकोप तक भय बिन होय ना प्रीत” या ओळी ऐकून समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो.”
पाकिस्तानने दहशतवाद्यांनना पाठिंबा दिला
पाकिस्तानला आम्ही योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं. आपली लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे ७ मेच्या रात्री आम्ही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई स्वतःची लढाई आहे असं मानून भारताला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं,अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत जनरल राजीव घई यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन लेसर गनने पाडण्यात आले. तसेच नूर खान एअरबेस नष्ट केला. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानासाठी पाक सैन्य जबाबदार आहे. आम्ही सीमा ओलांडल्याशिवाय अचूक हल्ले केले,अशी माहिती राजीव घई यांनी दिली.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये बदल झाला आहे, आपल्या नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. पापाचे हे पात्र पहलगाममध्ये भरले गेले होते. आम्हाला पूर्ण माहिती होती की पाकिस्तानही हल्ला करेल. म्हणूनच आम्ही आमच्या हवाई संरक्षणाची पूर्ण तयारी केली होती. तसेच एअर मार्शल एके भारती पुढे म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले आणि आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले. आपल्या हवाई संरक्षण दलात प्रवेश करणे अशक्य आहे. आम्ही चिनी क्षेपणास्त्र पाडले.