दोन दिवसानंतर त्याच १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
आसाममधील सामूहिक अत्याचार पीडित 14 वर्षीय मुलीने घटनेच्या दोन दिवस आधी तिच्या एका महिला नातेवाइकाला, लैंगिक अत्याचार म्हणजे काय गं? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नानंतर कुटूंबियांनाही धक्काच बसला. या अल्पवयीन मुलीनं विचारला अन् दोन दिवसानंतर तिच्याचसोबत होत्याच नव्हतं झालं.
आसाममधील नागाव जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू देखील झाला. आता पीडितेच्या एका महिला नातेवाईकाने सांगितले की, कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे पीडित मुलगी खूप अस्वस्थ झाली होती. या महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, या घटनेची बातमी वाचल्यानंतर तिने मावशीला विचारल, लैंगिक अत्याचार म्हणजे काय गं? या घटनेचा त्या अल्पवयीन मुलाच्या मनावर खोलवर परिणाम झाल्यासारखे वाटत असल्याचे महिलेने सांगितले.
हे सुद्धा वाचा: क्रुरकर्मा पुत्र..! वृद्ध आई वडिलांची गळा चिरून हत्या; नंतर कापलेले मुंडके टेबलवर…, मुलाचे घृणास्पद कृत्य
या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आणि राजकीय खळबळ माजली. जसजसे दिवस जात आहेत, तसंतशी नवीन अपडेट्स येत आहेत. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पीडित अल्पवयीन मुलीने घटनेच्या दोन दिवस आधी तिच्या मावशीला लैंगिक अत्याचार म्हणजे काय असे विचारले होते.
पीडित कुटुंबातील महिलेने सांगितले की, त्या मुलीसोबत असे काही घडेल, असे तिला कधीच वाटले नव्हते. ती म्हणाली की आजही मी तिला वाचवू शकली नाही याचा मला पश्चाताप होतो. पीडितेला शिक्षण घेऊन पुढे प्रगती करायची होती, असे महिला नातेवाईकाने सांगितले. पोलिसात डीएसपी पदापर्यंत पोहोचण्याचे तिचे स्वप्न होते. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता महिला डीएसपी तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. ट्यूशनवरून परतत असताना ही घटना घडली तेव्हा ही मुलगी तिच्या घरापासून एक किमी अंतरावर धिंग, नागाव येथे होती. स्थानिक लोकांना ती बेशुद्ध अवस्थेत सापडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे सुद्धा वाचा: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मिळालेल्या माहितीनुसार, ही पीडित मुलगी तिच्या मावशी आणि आजी-आजोबांसोबत राहत होती. ती मावशीसोबत ट्यूशनसाठी रिक्षाने येत होती. मात्र घटनेच्या दिवशी ती सायकल ट्यूशन शिकण्यासाठी गेली होती. मुलीच्या मावशीने सांगितले की, तिचे वडील गुवाहाटी येथे राहतात. पैशाअभावी त्यांनी आपल्या मुलीला मावशीकडे राहायला पाठवले. महिन्याला 10,000 रुपये कमावणारी मावशी मुलीचे शिक्षण आणि इतर खर्च उचलत होती. या घटनेनंतर आसाममध्ये प्रचंड निदर्शने झाली होती. यामध्ये मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
शनिवार, 24 ऑगस्ट रोजी एक आरोपी तफझुल इस्लामचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची बातमी आली. पोलिसांचे म्हणणे आहे की पहाटे 3.30 च्या सुमारास त्याला गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी नेले जात होते, तेव्हा त्याने ताब्यातून पळ काढला आणि तलावात उडी मारली. तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि सुमारे 2 तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.