दिल्ली: दिल्लीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याहून ७ वर्ष लहान असलेल्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नंतर त्याने तिला तिच्या घरातून पळवून नेलं. आरोपीने पिडीतेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडून दिल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी १६ महिन्यानंतर या नराधमाला दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरातून अटक केले आहे.
सांगलीतील 47 तोळे सोने चोरीचा लागला छडा; टोळीच्या म्होरक्याला बीडमध्ये ठोकल्या बेड्या
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की 28 मे 2024 रोजी पीडितेच्या आईने स्वरूप नगर पोलीस स्टेशनमध्ये तिची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 27 मे 2024 पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पीडितेचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर, 15 दिवसांनंतर पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरु केली.
पीडितेने घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना सांगितलं की, आरोपी तिला प्रेमाचं आमिष दाखवून बिहारच्या पाटणा येथे घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पोक्सो अॅक्ट अंतर्गत तसेच अपहरण आणि बलात्कार अशा कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी फरार होता आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी क्राइम ब्रांचकडे सोपवलं.
प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी क्राइम ब्रांचची एक टीम तयार करण्यात आली. त्यानंतर, लोकल इंटेलिजन्सच्या आधारे आरोपीला दिल्लीच्या लक्ष्मी नगर येथून ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. दरम्यान, आरोपी झारखंडचा रहिवासी असून तो स्वरूप नगरमध्ये मोबाईलच्या दुकानात काम करत होता आणि त्या काळात त्याने पीडितेशी मैत्री करून तिची फसवणूक केल्याचं आरोपीने सांगितलं.
१६ महिन्यानंतर आरोपीला अटक
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचं नाव निवास सिंग (24) असून त्याच्याविरुद्ध स्वरूप नगर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. संबंधित आरोपी हा मे 2024 पासून फरार असून त्याला एप्रिल 2025 मध्ये न्यायालयाने प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून घोषित केलं होतं. क्राइम ब्रांचच्या टीमने अखेर आरोपीचा शोध घेत त्याला 16 महिन्यांनंतर अटक केली आहे.