आंजी येथे अल्पवयीन मुलावर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमानं रुममध्ये बोलावलं (crime (फोटो सौजन्य : social media)
आंजी : डाग बंगला (रेस्ट हाऊस) मध्ये एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आंजी (मोठी) येथे शुक्रवारी (दि.4) दुपारीच्या सुमारास घडली. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी अण्णाजी उर्फ मारुती लक्ष्मण शेंद्रे (वय 50, रा. मांडवा व ह. मु. साई मंदिरजवळ) या आरोपीला अटक केली आहे.
आंजी (मोठी) येथील रेस्ट हाऊस पटांगणामध्ये शुक्रवारी दुपारच्या दरम्यान मुले खेळत होते. आरोपी अण्णाजी उर्फ मारुती लक्ष्मण शेंद्रे याची त्याची वासना अनैतिक कृत्य करण्याची गेली. अशातच त्याने एका अल्पवयीन मुलाला रेस्ट हाऊसमध्ये बोलावले व तुला दहा रुपये देतो, असे सांगून त्याच्यावर लैंगिक प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाने झालेला प्रकार आपल्या घरी जाऊन सांगितला असता घरातील मंडळीने खरांगणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खरांगणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी त्वरित चौकशी करून अण्णाजी उर्फ मारुती लक्ष्मण शेंद्रे याला ताब्यात घेतले. पुढील तपास खरांगणा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील व आंजी चौकीचे उपनिरीक्षक विनोद सानप, शिपाई किशोर वाडेकर करीत आहे.
महिलेच्या घरात घुसून हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, बीडच्या केज तालुक्यातील डोका गावामध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबीता भांगे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणात झालेली केस मागे का घेत नाही? या कारणातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.