धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, थेट LinkedIn वर केली शेवटची पोस्ट, पाहा VIDEO
Atul Subhash VIDEO : एका धक्कादायक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये ती व्यक्ती आपल्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगत आहे. पहिल्यांदाच ही व्यक्ती म्हणतेय की, मी जीवन संपवतोय त्याचे कारण म्हणजे माझ्या पैशातूनच माझा दुश्मन पोसला जातोय. जो की मलाच त्रासदायक आहे. माझा पैसाच जर वकील, कोर्ट, पोलीस यांच्यात जाऊन मला त्रासदायक ठरणार असेल तर मी कशासाठी या पैशांचे मूळ ठेवू, मी या पैशांच्या मुळालाच नष्ट करतो. ज्यामुळे माझी पत्नी पुष्ट होतेय आणि मला आणखी त्रासदायक ठरतेय.
अतुल सुभाष व्हिडीओ, थेट लिंकडीनवरून शेअर केली शेवटची पोस्ट
माझ्या मुलांना माझ्या आईवडिलांकडे सुपूर्द करावे
मी स्वतःला संपवण्याचा विचार करीत आहे. माझ्या टॅक्समधूनच ही सर्व सिस्टीम काम करतेय. हा सर्व पैसा आपोआप माझ्या शत्रूंनाच मिळतोय. यामध्ये माझ्या बायकोने माझा छळ चालवला आहे. ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर ठेवतेय. माझ्या बायकोमध्ये काहीही मूल्य नाहीत, तर माझी इच्छा आहे तिने माझ्या मुलाला माझ्या आई-वडिलांना सुपूर्त करावे. माझ्या बायकोसोबत भेटताना कॅमेरासोबत भेटावे. पब्लिक प्लेसवर भेटताना बायकोसोबत भेटावे, माझ्या मृतदेहाजवळ देखील पत्नीला फिरकू देऊ नये.
माझ्या शत्रूंना शिक्षा होईपर्यंत अस्थिविसर्जित करू नये
माझ्या अस्थिविसर्जन तोपर्यंत न व्हावे जोपर्यंत मला त्रास देणाऱ्या व्यक्तींना कोर्टने शिक्षा केली आहे. माझी इच्छा आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या आई-वडिलांशी, भावाशी मी पर्सनल बोलणार आहे. आणि मी माझे जीवन संपवणार आहे. असे अतुल सुभाष याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
महिलांसाठी बनत असलेल्या कायद्यांचा गैरवापर
सध्या महिलांसाठी बनलेल्या कायद्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटाचे खटले कोर्टात दीर्घकाळ प्रलंबित राहतात. तारखांवर तारखा मिळतात परंतु न्याय मिळत नाही. याच कायद्याच्या प्रक्रियेत अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीचा बळी गेला आहे. लग्नानंतर पत्नीसोबत आनंदी जीवन जगायचं स्वप्न पाहणाऱ्या अतुल यांना अग्निला साक्षी ठेवून घेणाऱ्या आगीतच आपल्याला जळून जावं लागेल याचा विचारही केला नसेल. पत्नीच्या एकापाठोपाठ एका गंभीर आरोपाने त्रस्त होऊन आणि कोर्टात न्याय मिळत नसल्याने निराशा आलेल्या अतुलने आयुष्याची लढाई अर्धवट सोडली आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
मानसिक छळ
अतुल सुभाष यांच्या मानसिक छळाचा अंदाज यावरून लावता येईल की त्यांनी मृत्यूपूर्वी जवळपास २४ पानाची सुसाईड नोट लिहिली आहे. दीड तासाचा व्हिडिओ बनवला ज्यातून त्यांना होणारा त्रास दिसून येतो. बंगळुरूतील अतुल सुभाष यांचं लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारी निकिता सिंघानिया यांच्याशी झालं. लग्नाच्या काही दिवसापर्यंत सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर निकिता अचानक बंगळुरूवरून जौनपूरला निघून गेली. तिने पती अतुल आणि सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचार याचा खटला भरला.
सासरच्यांवर लावले आरोप
अतुल सुभाष याने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, माझ्या मृत्यूसाठी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया, चुलत सासरे सुशील सिंघानिया हे जबाबदार आहेत. पैसे हडपण्यासाठी निकिता आणि तिच्या घरच्यांनी षडयंत्र रचले. मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवले असा आरोप त्याने केला. आतापर्यंत कोर्टात १२० तारखा झाल्या, ४० वेळा मी स्वत: बंगळुरूहून जौनपूरला गेलो. आई वडील-भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. बहुतांश तारखेला कोर्टात काहीच हाती लागलं नाही. कधी न्यायाधीश यायचे नाहीत तर कधी कामामुळे तारीख पुढे ढकलली जायची. अतुलला त्याच्या कामावर केवळ २३ सुट्टी मिळत होत्या. कायदेशीर जाचात अडकलेल्या अतुलची अवस्था बिकट झाली होती.