File Photo : Crime
अमरावती : लोणी टाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 7) उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी ऑटोचालकाला अटक केली आहे. अमरावतीत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
वसिम खान नजिर खान (42, रा. लोणी टाकळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेच्या माहितीवरून लहुजी सेना संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात निदर्शने केली. तणावसदृश्य स्थिती पाहता क्युआरटी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. 12 वर्षीय मुलगी शाळेत गेल्यानंतर दुपारच्या सुट्टीत स्टेशनरी दुकानात पैसे देण्यासाठी गेली होती. दरम्यान, आरोपीने निर्जनस्थळी नेणून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही शाळेत गेली. त्यावेळी रडत होती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी या घटनेची माहिती मुलीच्या आजी-आजोबांना दिली.
दरम्यान, आजी-आजोबा शाळेत पोहोचल्यानंतर मुलीला याबाबात विचारणा केली असता, तिने घडलेला प्रसंग सांगितला. अखेर सायंकाळी 4 वाजता पीडित मुलीसह आजी-आजोबांनी लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेवर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता दिरंगाई होत असल्याचे पाहून नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. माहिती मिळताच लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गोंधळ घातला.
गुन्हा दाखल, आरोपीला अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती लोणीचे पोलिस सतीश खेडकर यांनी दिली.
बापाचा स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका बापाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी रविवारी (2 फेब्रुवारी) आईने पोलिसांना लेखी तक्रार दिली आणि घटनेची माहिती दिली. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. त्याच वेळी या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.
हेदेखील वाचा : Delhi Election 2025: मतदानापूर्वीच आप आमदार दिनेश मोहनियांविरुद्ध एफआयआर; महिलेचे गंभीर आरोप