"रोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा," नवी मुंबई पोलिसांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)
सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे ऐरोली सेक्टर २ येथील सुनील जाधव यांना त्यांच्याच चाळीतील रोहित महाजन, स्वाती महाजन, व विशाल महाडिक यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी सुनिल जाधव हे अनुसूचित जातीचे असल्याच माहित असताना देखील आरोपी विशाल महाडीक याने जाणुनबुजुन सुनिल जाधव यांना आरोपी स्वाती महाजन हिच्या पाया पडुन, शिवीगाळ व मारहाण करून धमकी देवून तिच्या पायावर नाक घासायला लावल्याची निंदनीय घटना ऐरोलीत घडली आहे. तसेच “तु खालच्या जातीचा आहेस, कुठे हि जा. तुला मारून टाकेन” असे जातीवाचक बोलून अपमानित करून धमकी दिली. गुन्हेगारांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र अद्याप आरोपी अटक नसल्याने नागरिकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त रबाळे राहुल धस यांची भेट घेतली. व फरार आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अश्या आश्याच पत्र दिल आहे. आरोपीचा शोध सुरु असून लवकरात लवकर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणार असं सहाय्यक आयुक्त धस यांनी सांगितलं.
या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरात या ठिकाणी देखील जाऊन आल. आरोपींनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांना तांत्रिकदृष्ट्या ट्रेस करणं अवघड होत आहे. मात्र तरी देखील पोलीस कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना लवकरच अटक करतील, असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त, राहुल धस यांनी व्यक्त केलं.






