तब्बल 25 लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटले;
पाचोड : पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दावरवाडी येथील शाखेत 25 लाखांची रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाठलाग करुन लुटले. पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून 25 लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी भरदिवसा सकाळी अकरा वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून दावरवाडी येथील बँक कर्मचारी गणेश आनंद पहीलवान हे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता आपल्या स्कुटी दुचाकीवरून (क्रमांक एम एच २० बी झे ८३७४) निघाले होते, पाचोड पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कूटीला कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या स्कूटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख 25 लाख रुपये हिसकावून घेतले.
या घटनेनंतर गणेश पहेलवान यांनी तत्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली. तसेच चोरट्यांचा काही काळ पाठलागही केला. मात्र, चोरट्यांनी डेरा मार्गी आपला मोर्चा वळून सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस उपनिरीक्षक राम बहाराते, गोविंद राऊत, संदीप वैद्य, अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चोरट्यांचा मागोवा काढला. या घटनेची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता पोलिस अधिकारी पनव इंगळे, संतोष मिसाळे, विष्णू गायकवाड यांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन सर्व घटनेची पाहणी करून आपल्या पद्धतीने तपासाचे चक्र फिरवली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यामध्ये पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
गेल्या काही दिवसांपासून पाचोड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून चोरी प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे पाचोड पोलिसांसमोर या गुन्हातील आरोपी पकडण्याचे एक मोठे आव्हान असणार आहे.
हेदेखील वाचा : Dhule Crime: धुळे हादरलं! मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचं औषध देत महिलेवर केले अत्याचार; 60 लाखांची उकळली खंडणी






