शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत दोन्ही महिला रात्री आपल्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अर्जविक्रीला वेग; 357 अर्जांची विक्री, अवघ्या दोन दिवसांत…
दरम्यान, या दुहेरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ला कोणत्या पद्धतीने करण्यात आला, घरात प्रवेश कसा झाला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती आहे.
बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतानाच शेरेवाडीतील या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सोमवारी माळेगावातील राजहंस चौकात दोन युवकांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी काऱ्हाटी येथेही हल्ल्याची घटना समोर आली होती.
त्यातच आता दोन वयोवृद्ध महिलांची हत्या झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्येचे कारण आणि आरोपींची ओळख पटविणे हे पोलिसांसमोरचे प्रमुख आव्हान आहे. तपासातून या घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे.
Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
जाणाऱ्या शेरेवाडी गाव अत्यंत शांत समजले जाते. पण मध्यरात्री झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये मोठी भितीचे सावट पसरले आहे. अज्ञात आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांना सुचना दिल्या आहेत. याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. लवकरच आरोपींना शोधून बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
“घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. हत्येमागील कारण शोधण्यासाठी आणि आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.”
— पोलीस प्रशासन, बारामती






