Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय गणिते बदलणार; आकडा ठरेल निर्णायक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही प्रवाह जर एकत्र आले, तर राज्यातील सत्तासमीकरणे पूर्णतः बदलू शकतात, असे चित्र सध्या दिसत आहे. दोन्ही गटांकडे असलेली लोकप्रतिनिधींची संख्या पाहता ही ताकद कोणत्याही आघाडीला निर्णायक ठरू शकते.
सध्या राज्यात आणि केंद्रात दोन्ही राष्ट्रवादीकडे मिळून लक्षणीय संख्या आहे. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही पातळ्यांवर राष्ट्रवादीची उपस्थिती आहे. ही संख्या एकत्रित झाली, तर ती केवळ आकड्यांची बेरीज न राहता राजकीय दबावाची ताकद बनेल. राज्यात सध्या सत्तेत असलेल्या आणि विरोधात असलेल्या दोन्ही बाजूंना राष्ट्रवादीची ही एकजूट महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः आगामी निवडणुका, मंत्रिमंडळ विस्तार, तसेच केंद्र-राज्य संबंधांच्या दृष्टीनेही याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
हेदेखील वाचा : Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही…; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान, राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचीही चर्चा आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास त्या प्रभावीपणे काम करू शकतात, असे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. राज्यसभेचा अनुभव आणि प्रशासकीय समज हे त्यांचे जमेचे बाजू मानले जात आहेत.
…तरच एकजूट येऊ शकते प्रत्यक्षात
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे वैचारिक साम्य, पक्षाची मूळ ओळख आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा हे घटक महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र, नेतृत्व, सत्तावाटप आणि भविष्यातील दिशा यावर स्पष्टता आली तरच ही एकजूट प्रत्यक्षात येऊ शकते. एकूणच, जर ही घडामोड घडली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल, असे म्हणावे लागेल.
…तर तो पक्षाचा निर्णय असेल
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या अनुभवी नेत्यांची मोठी फळी त्यांच्या पक्षात असताना जर हा निर्णय झाला असेल, तर तो पक्षाचा निर्णय आहे. मात्र, त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी असल्याने शेवटी हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच घेतला असावा, असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी केले.
हेदेखील वाचा : Sanjay Raut PC : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का? संजय राऊतांचा खळबळजनक दावा






