बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. परळी शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात मधोमध हळद कुंकू
लिंबू टाकून कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी भर दुपारी घडली आहे. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत हा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराची शहरभर चर्चा झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्र घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठलं आणि कारवाईची मागणी केली आहे.
परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून परळीच्या माजी नागराध्यक्षानीच असा प्रकार केल्याने सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडून प्रतिष्ठापना निमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये गोंधळी, तृतीय पंथी, संबळवादक, आरती आदींचा सहभाग होता. दरम्यान ही मिरवणूक राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणाहून जात असतांना या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हळदी कुंकुवाने चौकोन बनवून त्यावर नारळ, नागवेलीची पाने वापरत मिरवणुकीत सहभागी असलेल्या एकाकडून कोंबड्याचा बळी घेण्यात आला आणि ते कोंबडे रस्त्यावर फेकून देण्यात आले. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या अधिक तपास करत आहे.
Beed Crime: केस मागे का घेत नाही? म्हणत महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला
बीडच्या केज तालुक्यातील डोका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव बबीता भांगे असे आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण जुन्या भांडण्यात झालेली मागे घेण्यावरून झाली असल्याचे समोर आले आहे.
व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या