वाशीम: वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडीओ चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका ४० वर्षीय विवाहित महिलेले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी २ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद व त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद असे आहे. यांच्या विरुद्ध कलम 108, 351 (3), 352 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. पीसीत महिलेसोबत ओळख करून विश्वासात घेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन शारीरिक संबंधाचे चित्रफीत तयार करून ठेवले होते. वेळोवेळी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्याच्या त्रासाला कंटाळून आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने आत्महत्या केली आहे. पीडितेच्या पतीने पोलिसात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारंजा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
तलाक, तलाक, तलाक! ‘मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो…’; लग्नानंतर २ महिन्यांनी पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पतीने आपल्या नववधूला तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित पत्नीचा आरोप आहे की, पतीने तिला फोनवर सांगितले की, “मला दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. ती खूप सुंदर आहे. मी तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले.” म्हणूनच मी तुला तलाक, तलाक, तलाक देतो”. पतीने फोनवर तीन वेळा सांगितले की आता आमचे कोणतेही नाते नाही. मी तुला सोडले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
असे म्हटले जाते की, दोघांनी फक्त दोन महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीने आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. तिहेरी तलाकनंतर पीडित महिला तिच्या सासरच्या घरातून निघून तिच्या आईवडिलांच्या घरी परतली आणि तिच्या पालकांना संपूर्ण कहाणी सांगितली. पत्नीनेही पोलिस ठाण्यात जाऊन पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी पतीला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.