लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर मारहाण केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. हा सहकारी म्हणजे ज्या दिवशी केजला लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाला होता तेव्हा गाडीवर बसून दंड थोपटणारा हा कार्यकर्ता आहे. पवन कंकर अस त्याच नाव आहे. सावरगाव गावाजवळ जेवण करण्यासाठी थांबल असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात मात्र लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले आहेत.
लक्ष्मण हाके यांचा आरोप काय ?
मराठ्यांना का शिव्या देतोस? म्हणून मारहाण करण्यात आली. मारहाण केलेले कार्यकर्ते हे विजयसिंह पंडित यांचे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. जेवण करण्यासाठी थांबले असता २० ते २५ जणांनी हल्ला केला आहे. त्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर लघुशंका करण्याचा प्रयत्न करून वीडियो व्हायरल करण्यात आला. बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर आम्ही पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असा थेट इशारा दिला आहे.
कोण आहे पवन कंकर?
हा लक्ष्मण हाके यांचा कार्यकर्ता आहे. ओबीसी सभेसाठी तो लक्ष्मण हाके यांचसोबत पाहायला मिळतो. गाडीवर बसून लक्षण हाके यांचे संरक्षण करत त्याने गेवराईत दंड थोपटले होते. त्याने सभेमधूनही थेट आव्हान दिल होत . मात्र त्याच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे .
या प्रकरणात ज्या हॉटेलवर तो जेवण करण्यासाठी थांबला होता. त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेलमध्ये विजयसिंह पंडित यांचा फोटो होता आणि फोटो पाहून त्याने ऑर्डर रद्द केली. आणि मराठ्यांना का शिव्या देतो म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हॉटेल मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागणी काय?
या प्रकरणातील सगळ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यात हा कार्यकर्ता लक्ष्मण हाके यांचा कार्यकर्ता होता. मारहाण करणाऱ्यांना कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बापाचा राग काढला मुलावर, छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार; कारण काय तर…