बिहारच्या किशनगंज येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तांत्रिकाच्या मृत्यूनंतर शिष्याने त्याच्या कबरीतून गुरूचा मृतदेह काढून त्याचे शीर कापून स्वत:सोबत घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या तांत्रिक विद्येसाठी शीर कापून नेले असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक करण्यात आली असून संपूर्ण भागात दहशत पसरली आहे.
बापाचा राग काढला मुलावर, छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार; कारण काय तर…
प्रकरण काय नेमकं?
बिहारच्या किशनगंज टाऊन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात महीन गाव पंचायती अंतर्गत मडुआ टोली गावातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजेन राय उर्फ अलगू बाबा तांत्रिक क्रिया करायचा. अनेक लोक तांत्रिकक्रिया करण्यासाठी त्याच्याकडे यायचे. या दरम्यान २५ वर्षीय युवक श्री प्रसाद देखील त्याच्याकडे तांत्रिकक्रिया शिकण्यासाठी यायचा. तांत्रिक अगलू बाबा याचा १५ दिवसांपूर्वी प.बंगालच्या लाहिल येथे मृत्यू झाला होता. त्याला कबरीतून दफन करण्यात आले होते.
२५ वर्षीय युवक श्री प्रसाद बंगाल याला गुरूच्या मृत्यूची बातमी कळताच त्याने त्याच्या बाबाच्या कबरीची रेकी केली. त्याने संधी साधून रात्री कबरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे शीर धारदार हत्याराने कापून आपल्या सोबत किशनगंजला घेऊन आला. सकाळी गावातील लोकांनी पाहिले की अलगू बाबाची कबर कोणीतरी खोदली आहे. कोणीतरी शीर धडापासून वेगळे करुन गायब केले आहे. या घटनास्थळापासून ७ किमी दूरवर बिहारच्या किशनगंजमध्ये गाववाल्यांनी श्री प्रसाद याला सकाळी झोळीतून मुंडके घेऊन जाताना पाहिले.
स्थानिकांनी काय सांगितले?
त्यानंतर गावातील लोकांनी त्यासंदर्भात विचारणा केली. ही बातमी आगीसारखी पसरली आणि गावकरी जमले. त्यानंतर एका स्थानिक युवकाने सांगितले की श्री प्रसाद तंत्र मंत्र करतो. आणि त्याच्या गुरुला तंत्रमंत्र विद्या येत होती. त्याच्या मेंदूत खूप ज्ञान होते. यासाठी तंत्रमंत्र करण्याच्या उद्देश्याने कबरीतून त्याने शीर काढून आणल्याचे सांगितले. स्थानिकांनी त्याला ताब्यात घेत मारहाण केली. नंतर पोलिसांच्या हवाले केले.
शीर कुठे लपवले?
या प्रकरणाची माहिती मिळाळ्यास पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. युवकाने तांत्रिकाचे शीर बांबूच्या झाडीत लपवले होते, ते शीर नंतर पोलिसांना ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक सागर कुमार यांनी सांगितले की ही घटना प. बंगालची आहे. चौकशीनंतर आरोपीला बंगाल पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे.
Pune Crime: नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार; पुण्यातून 5 मुलींची सुटका