काय घडलं नेमकं?
ममता कुमारी (२२), आदित्य कुमार (६), अंकुश कुमार (४), कृती कुमारी (२) असे मृतांचे नाव आहेत. कृष्मोहन कुमार यांची पत्नी आणि तीन मुलांचा अपहरण १० जानेवारी रोजी झाला होता. कृष्मोहन कुमार हे पेशाने ऑटोचालक असून ते बखरी सिपाहपूर येथील अमरेंद्र कुमार सिंह यांच्या घरात भाड्याने राहतात. १० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पाच वाजता ते ऑटो चालवण्यासाठी झिरो माइल परिसरात गेले होते. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांच्या आईने सांगितले की, ममता कुमारी दुपारी तीनही मुलांना घेऊन बाजारात गेली होती, मात्र घरी परतली नाही.
त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच तपासाला सुरुवात केली. तर पोलिसांना थेट त्यांचे मृतदेह चंदवारा घाट पुलाखाली गंडक नदीच्या काठावर बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
नातेवाईकांनी केला आरोप
मृतांच्या नातेवाइकांनी चौघांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी अहियापूर पोलीस ठाण्यात ममता कुमारी व त्यांच्या तीन मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.
भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…
Ans: मुजफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस ठाणे हद्दीत, चंदवारा घाट पुलाखाली.
Ans: ममता कुमारी (22) व तिची तीन लहान मुले – दोन मुले आणि एक मुलगी.
Ans: एसपी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.






