बीड क्राईम न्यूज (फोटो- istockhoto)
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. बीडमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले होते. बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. बीडमधून एक तरूणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका युवकाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. अपहरण करून त्या युवकाला झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्काडेंक घटना घडली आहे. दरम्यान या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला आहे. अनैतिक संबंधातून ही मारा झाल्याचे समोर आले आहे, असे सांगितले जात आहे.
बीड पोलिसांनी युवकाचे अपहरण आणि त्याला मरण या प्रकरणात ७ जणांना अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अनैतिक सबंधातून एक युवकाचे अपहरण करण्यात आले. त्याला झाडाला बांधून मरण करण्यात आली. त्यानंतर युवकला उपचारांसाठी रूग्णालयात नेले असतं त्याचा मृत्यू झाला आहे.
गावात श्रमदानात सहभागी न झालेल्या कुटुंबाला सरपंचाकडून मारहाण
बीड जिल्हा हा काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. अनेक गुन्ह्याचे प्रकार समोर आले आहे. आता पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. घटना बीड तालुक्यातूल वंजारवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या कुटुंबाकडून फिर्याद देण्यात आली,. फिर्यादीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियकराच्या दबावामुळे मुंबईतील तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यांनंतर धक्कादायक कारण उघड
मुंबईतील मशीद बंदर परिसरात राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं होत. तरुणीने ८ मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शनिवारी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा तरुणीचा प्रियकर असल्याचं समोर आला आहे. तरुणीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मुलीच्या मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मृत तरुणी ही चरणी चर्नीरोड येथील महाविद्यालयात बँकेशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. मृत तरुणी मशीद बंदर येथे पालकांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा बांधकाम क्षेत्राशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहम बेंगडे असे आहे.