बिहार: बिहारमधील जहानाबाद इथ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी परीक्षा देवून आपल्या घरी परतत होती. वाटेत तिने मगदूमपूर इथ एक ऑटो बुक केली. ऑटोवाला जवळ आला त्याने वेगळ्या मार्गाने ऑटो घरी नेण्याचा प्रयत्न केला. मार्ग वेगळा आहे हे तिच्या लक्षात आल. मुलगी काही करेल तेव्हड्यात त्याने ऑटो ही एका निर्जन स्थळी घेवून गेला. त्याची वाईट नजर त्या मुलीवर पडली होती. त्याने वाटेत ऑटो थांबवला आणि तिच्या सोबत घृणास्पद कृत्य करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण पोलीसात गेल्यावर ऑटो चालकाला अटक करण्यात आली आहे.
Akola News: ‘विज्ञानवेध’ उपक्रमांतर्गत ३१ विद्यार्थ्यांचा इस्रो व दक्षिण भारत शैक्षणिक दौरा
आरडाओरडा केला मात्र कोणीच आल नाही
जेव्हा नराधमाने तिच्यावर बलात्कार केला तेव्हा तिने खूप आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी वाचवायला येईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र ते स्थळ ओस पडलेलं होत. तिथे कोणीच आल नाही. चालकाने तिच्यावर बलात्कार करून तिला तिथेच सोडून दिल आणि त्या नंतर तो तिथून फरार झाला. ती कशीबशी घरी पोहोचली आणि सगळा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. आईने तिला घेवून पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्याच्या विरोधात तक्रार केली.
आरोपी रिक्षा चालकाचा कसा लागला शोध
शाळकरी मुलीने ऑटो बुक केली होती. एका ठिकाणी ती रिक्षा कैद झाली. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे हे सोप गेल. मुलीच्या आईने तक्रार करताच त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेनं जहानाबाद इथल्या शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी ऑटोने ने प्रवास करणे किती धोकादायक आहे. त्याच्या वसनांध वृत्तीला मुलगी बळी पडली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. सध्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
Ans: आरोपी हा रिक्षाचालक.
Ans: आरोपीने रिक्षा निर्जन स्थळी नेली.
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






