Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं
काय नेमकं प्रकरण?
आरोपी मुलाचं नाव अंबेश आहे. त्याचे वडील श्यामबहादूर (६२), पत्नी बबिता (६०) सोबत अहमदपूरजवळ नवीन घर बांधत होते. जून महिन्यात ते रेल्वेतून निवृत्त झाले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. अंबेशचं बीटेक पूर्ण झालं होते. पाच वर्षांपूर्वी त्याने एका मुस्लीम मुलीसोबत लग्न केलं होतं. मुलगी ही ब्युटी पार्लर चालवत होती. या लग्नाला अंबेशच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे लग्नानंतर अंबेशची पत्नी सासरी येऊ शकत नव्हती. या लग्नावरुन घरात वारंवार वाद होत होता.
लग्नानंतर अंबेशला दोन मुलं झाली होती. मात्र तरीही अंबेशच्या कुटुंबाने तिचा स्वीकारल नाही. अंबेशचे वडील त्याला घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. अंबेशने हा सगळा प्रकरण आपल्या पत्नीला सांगितलं. शेवटी तिनेही पोटगी देऊन नात्याचा शेवट करण्यास सहमती दिली. तिने ५ लाख पोटगी साठी मागितले होते.
पैसे देण्यास नकार आणि…
८ डिसेंबरला अंबेश वडिलांकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की त्याने आईला मारहाण केली. याचदरम्यान रागाच्या भरात अंबेशने शेजारी ठेवलेल्या लोखंड्याच्या रॉडने आईच्या डोक्यावर वार केला. आई खाली कोसळली आणि तडफडू लागली. हे बघताच त्याच्या वडील घाबरले आणि त्यांनी कोणाला तरी कॉल केला. घडलेला प्रकार ते कॉलवर सांगणार तेव्हड्यात अंबेशने वडिलांच्या डोक्यावरही वार केला. यानंतर तेही खाली कोसळले. काही वेळाने अंबेशचे आई-वडिल दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
गोण्या लहान पडल्या म्हणून केले तुकडे
मृत्यूनंतर अंबेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराखाली गॅरेजमधील रिकाम्या सिमेंटच्या गोण्या आणल्या मात्र या गोण्या लहान होत्या. त्यामुळे त्याने करवतीने आई- वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. आधी डोकं वेगळं केलं, त्यानंतर कंबरेपर्यंतचा भाग, कंबरेपासून गुडघ्यापर्यंत भाग कापला. शेवटी गुडघ्यापासून पंजापर्यंत भाग वेगळा केला. हे सर्व तुकडे गोणीत भरले आणि गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण पहाटे पाच वाजता सुमारास अंधारात कार घेऊन बेलाव पुलावरुन मृतदेह नदीत फेकला. यानंतर तो घरी निघून गेला.
अंबेशने बहिणींना सांगितली वेगळीच कहाणी
बहिणींनी जेव्हा आई- वडिलांबद्दल विचारलं तेव्हा अंबेशने वेगळीच कहाणी सांगितली. आई-वडील रागाने कुठे तरी निघून गेले आहेत मी त्यांना शोधायला जात असल्याचे त्यांने सांगितले आणि गायब झाला. यांनतर बहिणींनी १३ डिसेंबरला पोलिसात तक्रार केली. यावेळी तिने तिघेजण बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोध सुरु केला. १५ डिसेंबरला पोलिसांनी अंबेशला ताब्यात घेतले. त्यावेळी तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. शेवटी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने घटनेची कबुली दिली.
Ans: पत्नीला घटस्फोट देण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरून आणि लग्नाच्या वादातून भांडण झाले.
Ans: मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले आणि आई-वडील रागावून गेले असल्याचं सांगितलं.
Ans: बहिणीच्या बेपत्ता तक्रारीनंतर तपास करून पोलिसांनी अंबेशला ताब्यात घेतलं.






