Bihar News: बिहारची राजधानी पाटणा येथे एका भाजपच्या नेत्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव सुरेंद्र केवट यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सुरेंद्र केवट यांच्यावर गोळीबार केला. सुरेंद्र केवट यांना चार गोळ्या लागल्या होत्या. त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सुरेंद्र केवट हे भाजप किसान मोर्चाचे पुनपुन विभागाचे अध्यक्ष होते.
कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी…
दोन नेत्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले
दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जखमी झाले. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. सुरेंद्र केवट यांना तातडीने पाटणातील एम्स रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र केवट यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच फुलवारीश्रीफचे आमदार गोपाल रविदास आणि माजी मंत्री शाम रजक यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. तिथे त्यांना केवट यांचा मृत्यू झाल्याचे कळले. दोन्ही नेत्यांनी केवट यांच्या कुटुंबाचे सांत्वन करत धीर दिला आहे.
आरोपींचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच पिपरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि मसौदीचे उपायुक्त कन्हैया प्रसाद सिंह यांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाला भेट दिली आणि पाहणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये नामांकित व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोपाल खेमका यांच्यावर त्यांच्या घराबाहेरच गोळ्या झाडण्यात आल्या. आता भाजपचे नेते सुरेंद्र केवट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. बिहार मधील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
उत्तरप्रदेश हादरलं! मावशीनेच केली सहावर्षीय मुलीची हत्या
दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येएक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या चिमुकलीला कुराण शिकवण्यासाठी तिच्या मावशीने आपल्या घरी नेले होते. मात्र, तिची मावशी तिच्याकडून नोकरासारखे घरातील सर्व कामे करून घ्याची. एवढाच नव्हे तर किरकोळ चुकांसाठी तिला बेदम मारहाण करायची. आरोपी मावशीने तिची हत्या केली असून तिला अटक केली आहे.
मुकादमाने केली ऊस वाहतूकदाराची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा