लोकसभा संसदेमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा वायनाडच्या खासदार म्हणून शपथविधी पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या व नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या आता लोकसभेमध्ये जाणार आहेत. त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड विजय मिळवला. यानंतर आता प्रियांका गांधी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यामुळे आता प्रियांका गांधी यांची लोकसभेमध्ये कार्याला सुरुवात झाली आहे. प्रियांका गांधी यांच्या रुपाने गांधी घराण्यातील आणखी एक व्यक्ती संसदीय कामकाजामध्ये आली आहे.
लोकसभेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. 25 नोव्हेंबर पासून हे अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र संसदेमध्ये सुरु झालेल्या गोंधळामुळे दोन दिवसांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा संसदेच्या कामकागाला सुरुवात झाली असून पोटनिवडणुकीमधील विजयी खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
लोकसभा भवनात वायनाडच्या खासदार म्हणून प्रियांका गांधी यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांनी हातामध्ये संविधानाचा प्रत ठेवली होती. राहुल गांधी यांच्याप्रमाणे प्रियांका गांधी यांनी देखील संविधान हाती घेत शपथ ग्रहण केली. सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी कामकाज पाहत आहेत. तर आता प्रियांका गांधी या देखील खासदार म्हणून कार्यरत होणार आहे. संसदेमध्ये प्रवेश देखील त्यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत केला.
Congress General Secretary Smt. @priyankagandhi ji takes the oath as a Member of Parliament from Wayanad.
📍New Delhi pic.twitter.com/lYqSLYbXSz
— Congress (@INCIndia) November 28, 2024
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रियांका गांधी यांचे नाव घेताच ते संविधानाचे पुस्तक हातात घेऊन तेथे पोहोचल्या आणि त्यांनी शपथ घेतली. वायनाडमध्ये, राहुल गांधींनी सोडलेल्या जागेवरील वायनाड पोटनिवडणूक प्रियांका गांधी यांनी विराट विजय मिळवला. प्रियांका गांधी या 4 लाखांहून अधिक मतांनी जिंकल्या आहे. त्यांनी सीपीआई सत्यन मोकेरी यांचा 4 लाख 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
प्रियांका गांधी यांची राजकारणात ‘एन्ट्री’
प्रियांका गांधी वाड्रा यांची 2019 मध्ये पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. एक वर्षानंतर त्यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी देण्यात आली. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रभाव पाडू शकला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील सर्वात जुन्या पक्षाचे नेतृत्व करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रायबरेलीमधून प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा होती. मात्र, संघटनात्मक जबाबदारीमुळे त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला.