मित्रानेच केला घात! ‘80 लाख दे, पत्नीला माझ्याकडे पाठव', व्यावसायिकासोबत घडला भयंकर प्रकार (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News Marathi: मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करून ८० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. प्रकरण इथेच थांबले नाही, तर आरोपीने व्यावसायिकाच्या पत्नीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधांची मागणीही केली. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला त्रास देत होता. अखेर आरोपींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जॉन परेरा नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी परेरा गेल्या सहा महिन्यांपासून पवईतील एका व्यावसायिकाला आणि त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परेरा हा पीडित व्यावसायिकाचा मित्र आहे. त्याच्याकडे त्या व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडिओ होते, ज्यामध्ये त्या व्यावसायिकाच्या पत्नीचे आणि तिच्या मित्रांचे काही आक्षेपार्ह फोटो देखील होते. आरोपी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने व्यावसायिकाकडून ८० लाख रुपयांची मागणी केली होती. जर पैसे दिले नाहीत तर व्यावसायिकाच्या नातेवाईकांमध्ये आणि ऑफिस ग्रुपमध्ये सर्व वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपी ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत सतत ब्लॅकमेल करत होता. आरोपी व्हॉट्सअॅपवर कॉल करून ब्लॅकमेल करत होता आणि धमकी देत होता.
अखेर आरोपींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसूल करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडल्याने, पवई पोलिसांनी हे प्रकरण डीएन नगर पोलिसांना सोपवले आहे. पोलिसांनी या संदर्भात काही पुरावे डीएन नगर पोलिसांनाही दिले आहेत. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. पोलिसांनी माहिती दिली आहे की लवकरच आरोपीची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्याला अटक केली जाईल. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.